गायीचे शेण व गोमुत्रचे सेंद्रिय शेतीमधील फायदे
Benefits-of-cow-dung-and-cow-urine-in-organic-farming
गायीचे शेण व गोमुत्राचे महत्व सेंद्रीय शेतीमध्ये खुपच महत्वाचे आहे. गायीच्या शेणाचा उपयोग परदेशामध्ये फक्त खतासाठी होतो. परंतु भारतीय संस्कृतीमध्ये त्याचा उपयोग ग्रामीण भागामध्ये जमीन व भींती सारवण्यासाठी करतात. रोज सकाळी अंगणात शेणाचा सडा टाकतात. शेतात पेरलेले बी किडीने, पक्षाने व उंदराने खावू नये म्हणून त्यावर शेण व मातीचे पातळ आवरण लावतात.
किडी व रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी गायीचे शेण व गोमुत्राचा उपयोग होतो. तथापि ज्या खताला शेणखत दिलेले असते त्या पिकावर किडी व रोगाचा प्रादुर्भाव कमी आढळतो. कारण त्याच्या विरुध्द लढण्याची ताकद पिकामध्ये निर्माण होते आणि पिके निरोगी बनतात. त्याच प्रमाणे शेणखतामुळे जमीन सशक्त, निरोगी, रवेदार व सुपीक राहते. जमिनीतील जिवाणूंचे व गांडुळांचे संवर्धन होते.
जास्तीचे पाण्याचा उत्तम प्रकारे निचरा होतो. पिकांना नत्र, स्फुरद व पालाश यासह सुक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित प्रमाणात मिळतात. अशा जमिनीत उत्पादन झालेले अन्न खाल्ल्याने माणसे व जनावरे सुदृढ व निरोगी राहतात. सध्या शेणामधून गोबरगॅस घरोघरी सोप्या पध्दतीने तयार करता येतो. खड्ड्यात शेणाचे रुपांतर खतात होते तेव्हा त्या प्रक्रियेत सेल्युलोजचे रुपांतर कार्बनडाय ऑक्साईड वायुत होते अणि वायु वातावरणात विलीन होतात. गोबरगॅस संयंत्रणात शेण आंबण्याचे प्रक्रियेत मिथेन, हायड्रोजन व कार्बनडाय आक्साईड हे वायू निर्माण होता.
या वायुचे मिश्रण स्वयंपाकाचे जळणाकरिता किंवा रात्री दिव्यासाठी वापरता येते. शिल्लक राहिलेला शेणकाला खतासाठी उपयोगी पडतो.. शेणातील घटक : जनावरे जो चारा किंवा पशुखाद्य खातात त्या प्रमाणे शेणातील घटक असतात. वाढत्या वयाची जनावरे व दुभत्या गायी चाऱ्यातील अधिक नत्र, स्फुरद व चुना व इतर पदार्थ त्यांच्या शरीरातील मांस, हाडे दुध बनविण्यासाठी वापरतात. तर कामाचे बैल त्यांच्या वैरणीतील कर्बोदके व प्रथिने यांचे कामासही लागणाऱ्या उर्जेत रुपांतर करतात. वैरणीत व पशुखाद्यात निरनिराळे अन्नघटक असतात.
त्यापैकी कार्बोदके व प्रथिनांचा उपयोग उर्जेसाठी होतो. नत्र व प्रथिनांचा उपयोग उर्जेसाठी होतो. दुध व शरीर प्रकियेसाठी होतो. जनावरांनी वैरण खाल्ल्यानंतर पचन संस्थेत त्यावर विकर व सुक्ष्म जंतु क्रिया करतात आणि खाद्यातील जटील रेणूंचे कॉम्प्लेक्स मॉलेक्युल्स रूपांतर साध्या द्रव्य पदार्थात म्हणजे कर्बोदकाचे साखरेत, प्रथिनाचे अॅमिनो आम्लात आणि मेदाचे स्निग्ध आम्लात रुपांतर करतात.
हे पदार्थ रक्तात मिसळतात आणि संपूर्ण शरीरात पसरतात पण वैरणीतील काही घटक पचत नाहीत. उदा. लिग्रीन, सेल्युलोज व तत्सम कर्बोदके व प्रथिने वाळलेल्या गवतातील ५० टक्के आणि सरकीच्या पेंढीतील ८० टक्के प्रथिने पचतात व आवश्यक तेवढ्याच प्रथिनांचा उपयोग होतो. बाकीची शेणातून व मुत्रातून शरीराबाहेर टाकली जातात.
शेणात पचन न झालेल्या कर्बोदके व प्रथिनांसोबत जिवंत व मेलेल्या सुक्ष्म जंतुच्या पेशी असतात. शेणातील व जमिनीतील सुक्ष्म जंतु त्यांचे रुपांतर खतामध्ये करतात. नत्राचे रुपांतर अमोनियामध्ये होते आणि या स्वरुपातील नत्र दानाचे पिकाला सहज उपलब्ध होते. गोमुत्रात युरिया असतो आणि वैरणीत बहुतेक पालाश असतो. परंतु वैरणीतील स्फुरद, कॅल्शीयम व मॅग्नेशियम शेणात असते. म्हणजे गोमुत्रातुन पिकांना नत्र व पालाश मिळतो.
शेणाचा जमिनीवर ढिग केला की त्यात बरेच बदल होतात. ताजे शेण जिवाणूंच्या वाढीसाठी समर्थ असते. कारण त्यात वनस्पतीचे व जनावरांचे अवशेष असतात. त्यापासून जिवाणूंना उर्जा, योग्य क्षार व पाणी मिळते. त्यांच्या वाढीसाठी तापमान व हवा अनुकुल असते. अखेरीस सेंद्रीय द्रव्य व काही खनिज मूलद्रव्ये शिल्लक राहतात ताजे शेण पिकाकरिता फार उष्ण असते आणि त्याची त्वरीत क्रिया होते.
म्हणून मुरलेले शेणखत जमिनीत मिसळण्याची प्रथा आहे. ताज्या शेणापेक्षा कुजलेले शेणखत बागेतील पिकांना भरपूर घातले तरी अनिष्ट परिणाम होत नाही. याचे कारण कुजण्याचे प्रक्रियेत अनिष्ट परिणाम करणारा अमोनिया नाहीसा झालेला असतो आणि स्फुरद व पालाश शिल्लक राहतात. नत्राची भरपाई नत्र खताव्दारे किंवा गोमुत्रांनी केली की, संतुलित खतद्रव्ये पिकांना मिळतात.
सामान्यपणे एका गायीपासून दररोज सुमारे १० ते १२ किलो शेण मिळते. म्हणजे दरवर्षी ३ ते ४ टनापेक्षा अधिक शेण मिळते. मोठ्या गायीपासून आणि तिला चांगली वैरण भरपुर खावू घातल्यास यापेक्षा अधिक शेण मिळते. एका गायीपासून मिळणारे शेण व गोमुत्र गोळा केले तर त्यापासून मिळणारे नत्र एक हेक्टर तृणधान्य पिकासाठी पुरेसे असते. परंतु शेणखत जमिनीत मिसळण्यापूर्वी त्यातील ६० टक्के नत्राचा नाश होतो.
हा नाश दोन प्रकारे होतो. १) शेण कुजण्याच्या प्रक्रियेत रासायनिक बदल होवून नत्र वायु हवेत विलीन होतो. २) साठवलेल्या शेणखतातून आणि जमिनीवर पसरलेल्या शेणखतापासून पाण्यासोबत पाझरल्याने व बाष्पीभवनाने नत्राचा नाश होतो.
शेणखत तयार करण्याच्या पध्दती :
१ ) खड्डा पध्दतीने शेणखत तयार करणे.
शेणखतातील नत्राचा नाश कमी करण्यासाठी खड्डयात भाग पध्दतीने शेणखत तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या खड्ड्याचा आकार खालील प्रमाणे ठेवण्याची शिफारस कृषी विभागाने केली आहे.
२) गोमुत्र व शेणाची रबडी.
गोठ्यात जमा झालेले गुरांचे मल व मुत्र व शेण टाकीमध्ये एकत्र करुन त्यात १० पट पाणी मिसळावे हा शेणकाला ८ ते १० दिवस अंबवावा. दिवसातून ३ ते ४ वेळा ढवळने आवश्यक आहे. ढवळण्यामुळे त्यातील उष्णता व तयार होणारे वायू निघून जावुन नत्र स्थिर होण्यास मदत होते. असा हा काला जिवाणूंनी समृध्द असतो. हा शेणकाला १ ते १० दिवसानंतर पाटपाण्याबरोबर किंवा त्यात पाणी मिसळून झाडांना द्यावा. गोमुत्रामध्ये पिकांना आवश्यक अशी मुलद्रव्य आहे. गायीच्या मुत्रामध्ये रासायनिक पृथःकरण केले असता गोमुत्राच्या द्रावणामध्ये खालील आवश्यक घटक आढळून आले आहे..
गायीचे गोमुत्र मुख्यत्वे असेंद्रीय क्षार व पिग्मेंट यांच्या चयापचय क्रियेमुळे तयार झालेले नत्र व सल्फर यांचे द्रावण आहे. गोमुत्राचा रंग पिवळा असून प्रत्येक गायीच्या मूत्राच्या रंगात थोडा फरक आढळून येतो. देशी गायी विशेषतः काळी कपिला, पांढरी गाय इत्यादी प्रत्येकाच्या मुत्रात फरक आढळतो. गोमुत्रास पिवळा रंग हा युरोक्रोम या घटकामुळे येतो.
गोमुत्र हे पातळ द्रवरुप द्रावणात असते. गोमुत्राची विशिष्ट घनताही त्यात विरघळणाऱ्या विद्राव्य घटक व पाणी यांच्या विविध प्रमाणावर अवलंबून असुन विविध प्रमाणात असते. विशिष्ट घनता सर्वसाधारणपणे १.०३० ते १.०४५ विम्ल धर्मीय असून सरासरी वि.घ. गोमुत्र हे अल्कली विम्ल धर्मीय असून प्रत्येक प्राण्यामध्ये वेगवेगळे प्रमाण तसेच खाल्ले अन्न व चयापचय क्रियेवरही अवलंबून असते. सर्वसाधारणपणे गोमुत्र विम्ल धर्मीय असुन सामू पातळी ७.४ ते ८.४ नोंदवलेली आहे.
प्रत्येक गायीची गोमुत्राची क्षमता प्रतिदिन ८.८ ते २२.६ लिटर असून सरासरी १४.२ लिटर आहे. गोमुत्राची रासायनिक रचना ही फार गुंतागुंतीची असून सर्वसाधारणपणे मुख्य घटक पाणी, युरिया, क्रियोटिनीन, प्युरिन, अॅलेन्टोईन, हिप्युरिक अॅसिड, अमोनिया, अॅमिनो अॅसिड, इथेरिअल सल्फेट, न्यूट्रल सल्फर, संयुगे, असेंद्रीय क्षार आणि युरोक्रोम पिग्मेंट व युरोबिलिन यांच्याशिवाय इतर पॅथोलॉजिकल पदार्थ असू शकतात.
गोमुत्रातील फिनॉल, पॅराक्रिसॉल, कॅटेकॉल, अस्सीनॉल, हॅलोजनेटेड फिनॉल है घटक जिवाणूनाशक, विषाणूनाशक, कवकनाशक आहेत. म्हणून गोमुत्र हे पीक संरक्षणात सौम्य परंतु प्रभावी किटकनाशक म्हणून वापरता येईल. गोमुत्र हे कृषी क्षेत्रातील विविध घटकांकरिता दुष्परिणाम व हानीविरहीत जैविक रसायन आहे. गोमुत्रामध्ये नैसर्गिक स्वरूपात हा नत्र, सल्फर ही मुलद्रव्ये तसेच वाढीसाठी आवश्यक इतर मुलद्रव्ये मुबलक प्रमाणात असल्यामुळे पिकांना, झाडांना फवारणीव्दारे दिल्यामुळे ही अन्नद्रव्ये वनस्पतींना ताबडतोब उपलब्ध होतात.
त्यामुळे पिकांच्या झाडांना फवारणीव्दारे दिल्यामुळे ही अन्नद्रव्ये वनस्पतींना ताबडतोब उपलब्ध होतात. त्यामुळे पिकांच्या वाढीवर चांगले परिणाम दिसून येतात. त्याच बरोबर जमिनीतून दिल्यामुळे जमिनीतील सेंद्रीय पदार्थाच्या विघटनातून ह्युमस सारखे प्रभावी पदार्थ तयार होवून जीवनसत्वे ऑक्झीन, इंडोल अॅसिटीक अॅसिडसारखे वनस्पतीच्या वाढीस पोषक असणारी द्रव्ये निर्माण होतात.
तसेच गोमुत्रातील प्रभावी द्रव्ये जमिनीत नैसर्गिक स्थितीत असलेल्या इतर मुलद्रव्यांबरोबर एकत्र होवून संयुगे तयार होवून झाडांना मुळावाटे लवकर उपलब्ध होतात. त्यामुळे मुळांची जोरदार वाढ होते. झाडांच्या जमिनीतील अन्नग्रहण क्रियेत वाढ झाल्यामुळे झाडांच्या खोडाची व फांद्यांची समाधानकारक वाढ होते. झाडाच्या समाधानकारक वाढीमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येते.
*आपला भारत देश खंडप्राय देश असून कृषि प्रधान देश: म्हणून परिचीत आहे. शेती हाच भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा अनेक शतकापासून मानला जात आहे. जवळपास ७० टक्के लोकसंख्या कृषि क्षेत्राशी निगडीत आहे. याउलट प्रगत तथा विकसित राष्ट्रामध्ये २ ते ७ टक्के लोकसंख्या ही कृषी व्यवसायाशी निगडीत असते. जर आपण आपल्या कृषि क्षेत्रातील विकासाचा गेल्या ५० वर्षाचा आढावा घेतला तर परिस्थिती अत्यंत समाधानकारक आहे. अन्नधान्याचे उत्पादन जवळपास २००० दशलक्ष टनापेक्षाही अधिक करुन एक उच्चांक प्रस्थापित केला आहे.
त्याच बरोबर उत्तम पध्दतीने अन्न सुरक्षेची स्थिती प्राप्त केली आहे. खरे तर सेंद्रीय शेती ही पुरातन शेती पध्दत आहे. तिचे अनेक फायदेही आहेत. या शेतीचे चक्र हे रासायनिक खते विरहीत असते. परंतु गुणवत्तेच्या बाबतीत उत्पादन मात्र रासायनिक शेती पध्दतीपेक्षाही अधिक उत्तम असते. कमी खर्चात रासायनिक शेतीत थोड़े कमी उत्पन्न झाले तरी आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्याला फायदाच होतो. कारण हजारो रुपयाची औषधे खते तसेच लाखो रुपयाचे उर्वरक त्यामुळे वाचतात. त्यातून शेतकऱ्याला उत्पादनाची भरपाई होते.*
*शेतकऱ्यांच्या माहितीस्तव साप्ताहिक कृषकोन्नती वरून साभार.*
1 thought on “गायीचे शेण व गोमुत्रचे सेंद्रिय शेतीमधील फायदे”