Maharashtra Rain Update : गारपीटीचा अंदाज; मराठवाडा, विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज कायम.
Weather New Update : राज्यातील पावसाची ही परिस्थिती आणखी पुढील पाच दिवस राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
Krushi Warta : राज्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि वादळी पाऊस पडत आहे. तर कोकणात उष्णतेटी लाट जाणवत आहे. राज्यातील ही परिस्थिती आणखी पुढील पाच दिवस राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिनांक 26/04/2024 रोजी दिला आहे .
हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील ५ दिवस उष्णतेची लाट आणि उकाडा राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केला. तसेच रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज आहे.