औषधी वनस्पती
१.अश्वगंधा :
०.५ ते २ मीटर उंचीचे रोमश व डेरेदार क्षुप. पर्ण एकान्तार, ५ ते १० सेमी लांब, पांढरी लव असलेले. पुष्प पिवळट हिरवे, फळ लहान गोल रसदार पिकल्यावर गुंजेप्रमाणे लाल दिसणारे, बीज लहान पिवळे वृक्काकार ३३ ते १ मीटर लांब, कच्च्या मुळाला घोडयासारखा वास येतो म्हणून अश्वगंधा शरद ऋतूत फुले व त्यानंतर फळे येतात. वर्षा ऋतूत बी पेरतात व हिवाळ्यात मुळे काढून घेतात. सबंध भारतात व हिमालयात १.५ हजार मीटर उंचीपर्यंत मध्य प्रदेशच्या मंदसोर जिल्ह्यात व्यापारी तत्वावर लागवड केली जाते. औषधी
गुणधर्म
बळवाढीसाठी/शक्तिवर्धक आस्कंदचूर्ण दुधाबरोबर द्यावे. धातूक्षयांवर आस्कंद, तूप, व मध एकत्र करून द्यावीत. दूध वाढण्यासाठी (बाळंतणीस) अश्वगंधी, भुईकोहळा आणि ज्येष्ठमध यांचा काढा गाईच्या दुधाबरोबर द्यावा. वेडेपणा, राजयक्ष्मा, निद्रानाश, शुक्रक्षय या रोगांवर अश्वगंधची पेस्ट वापरावेत.
२. चंदन:
या झाडाचे व्यावहारिक नाव त्याच्या भारतीय नावावरून आले आहे. मध्यम आकाराचा, सदाहरित वृक्ष, फांद्या बहुतेक खाली लटकलेल्या, साल काळी, खडबडीत आणि त्यात सरळ चिरा असलेली, पूर्ण वाढलेले लाकूड सुगंधी, पाने ४-७ सेमी. लांब, संमुख, वरच्या पृष्ठभागावर चमकदार, फुले लहान, फिकी जांभळी, लहान गुच्छांत, फळे गोलाकार, ६ मि. मी. परिघ असलेली, जांभळी, काळी व रसदार.
वितरणः हा वृक्ष भारताच्या द्वीपकल्पी प्रदेशात विशेषतः दक्षिण भारतात नैसर्गिक अवस्थेत उगवतो.
औषधी गुणधर्म :
या झाडाच्या लाकडापासून (गाभ्यातून) काढलेले तेल औषधी आहे. हे तेल लघवी होण्याच्या, मूत्राशय सुजण्याच्या, परमा आणि कफ होण्याच्या उपचारात वापरले जाते. लाकूड पाण्याबरोबर उगाळून लेप तयार करतात, तो सुजेवर, तापात कपाळावर आणि त्वचारोगावर लावला जातो. बियांपासून काढलेले तेल त्वचारोगावर वापरले जाते.
लाकूड लहान घरगुती वस्तू बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्याचा सुवास
याच काळापर्यंत टिकून राहतो. लाकडाची भुकटी अगरबत्ती तयार करण्यासाठी वापरण्यात येते आणि सुगंधी भूकटी म्हणून देखील वापरली जाते. तेल, साबणे, उटी इत्यादीमध्ये स्रानाच्या सामानात सुगंधी म्हणून देखील वापरली जाते. तेल, साबणे, ऊटी इत्यादीमध्ये सानाच्या सामानात सुगंधी म्हणून मोठया प्रमाणावर वापरले जाते आणि कीटकनाशक म्हणूनही वापरतात.
३. पुनर्नवा ( वसू ) :
एक वर्षाचे किंवा बहुवर्षीपर्यंतचे झुडुप किंवा वेल. ०.६६ ते १ मीटर लांब ग्रीष्मात हे सुकते व पावसाळयात पुन्हा फुटते. पर्ण २.५ ते ४ सेमी. लांब गोल किंवा अण्डाकार, मांसल मागील बाजूस पांढरे असणारे. पुष्प लहान पांढरे किंवा गुलाबी, मूळ मोठे, बळकट पांढरे व वाळल्यावर त्याला पिळा पडतो, पाने अभिमुख असून त्यातील एक लहान व एक मोठे असते. वर्षाऋतूत फुले व फळे येतात. भारतात सर्वत्र मिळते.
औषधी गुणधर्म :
सुजेवर पुनर्नवा, देवदार, सुंठ व वाळा यांचा काढा द्यावा. रांताधळेपणात पांढऱ्या पुनर्नवेची मुळी कांजीत उगाळून अंजन करावे. लघवीला रग्न होत दोन वेळा द्यावा. दर चार दिवसाला येणाऱ्या तापावर श्वेतपुनर्नवाची मूळे दूधात उगाळून द्यावे. असल्यास पुनर्नवा काढा २० ते ४० मिलि. प्रमाणात रोज द्यावे.
४. रुई
१ ते २ मीटर उंचीचे गुल्मजातीय छोटे. कठीण काण्डत्वचा धुरकट आणि रेषायुक्त. पर्ण १० ते १५ सेमी. लांब व २.५ ते ७ सेमी. आयताकार. वरचा पृष्ठभाग गुळगुळीत व मागील पृष्ठावर पांढरी लव, पुष्प पांढरे वरच्या अर्ध्या भागात तांबूस वांगी रंगाचे फळ लांब आतल्या बाजूस वळलेले वाळल्यावर फळे आपोआप फुटून त्यातून मऊ कापूस बाहेर पडतो. त्याला बिया चिकटलेल्या असतात. त्या वायाबरोबर पसरतात. बीज लहान व काळे असते. संबंध भारतात कोरडया आणि तुरट रेताड जमिनीत उगवते. वसंत ऋतूत फुले व ग्रीष्मात फळे येतात.
औषधी गुणधर्म :
रूईच्या मुळाच्या सालीचा उपयोग गुप्तरोगावर होतो. कान दुखत असल्यास रुईची पिकलेली पाने तूप लावून अग्रीवर शेकून त्यांचा काढलेला रस कानात घालावा. दमा खोकला असेल तर रूईच्या पानांचा रस पोटात दिल्याने उलटी होऊन कफ पडून जातो (हा प्रयोग वैद्यांच्या देखरखीत करावा).
रूईची फुले, काळी मिरी, लवंग आणि शुध्द अफू समभाग प्रमाणात एकत्र खलून केलेल्या गोळ्या ३०० ते ६०० मि. ग्रॅ. प्रमाणात भूक न लागणे आणि पोट दुखणे यामध्ये द्याव्यात.
रूईची पाने व त्यांच्या. १२ प्रमाणात सैंधव मीठ एकत्र करून काळे भस्म तयार होते ते १ ते २ ग्रॅम प्रमाणात दिल्याने यकृत- प्लीहा रोग, गुल्म, पोटात पाणी होणे हे विकार बरे होतात.
५.सदाफुली
एक मीटर सरळ वाढणारी औषधी, पाने अंडाकृती संमुख, फुले अक्षकोनात दोन किंवा तीनच्या समूहात, दलपुंज पांढरी किंवा गुलाबी असलेले, एक जातीत दलपुंज पांढरे किंवा
खालच्या भागावर गुलाबी छटा असलेले फळे पुष्कळ बिया असलेली पुटक प्रकारची.
मूलतः हे झाड मादागास्करचे आहे, पण दोन्ही गोलाधीत, उष्णकटिबंधात नैसर्गिक अवस्थेत सापडते. ते लावले जाते व तेथूनच नैसर्गिक अवस्थेत उगवायला सुरवात होते.
औषधी गुणधर्म :
या झाडाची मुळे औषधी असतात. आधी या औषधात पोटदुखी निर्माण करणारे आणि विषारी गुणधर्म असल्याचे समजण्यात येत असे, परंतु यात अलीकडे मौल्यवान अॅल्कलॉईडचे प्रमाण दिसून आले आहे. या अॅल्कलॉईडचे साम्य सर्पगंधा जातीच्या झाडाशी दाखवण्यात येते.
सदाफुलीच्या मुळांत अॅजमॅलिसिसन आणि सेरपेंटाइन सर्पगंधाच्या मुळापेक्षाही जास्त प्रमाणात आहे. यात रेसरपाइनपण आहे. त्यात दुखण्याचा त्रास कमी करण्याचा, रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म आहेत. प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांनी असे दाखवून दिले आहे की सदाफुलीच्या ठराविक प्रकारच्या अकीचा रक्तांच्या कर्करोगावर उपयोग होतो.
इतर जाती :
हे एक तण म्हणून उगवते व कमरेतील उसण किंवा कटिवातात उपयोग असल्याचे सांगण्यात येते.
:वेखंड
वर्णन : झाड लहान व लांब सुगंधी बहुशास्त्री जमिनीत वाढणाऱ्या खोडांनी युक्त (मूलस्तंभे); कणिसाचा अक्ष पानासारख्या महाछदाने झाकलेला; फुले लहान हिरवट, ५ ते १० से. मी. लांब, गोल कणिसात कणिशकास छदकणिश म्हणतात, फळे पिवळसर रंगाची.
हे झाड भारतात समुद्रसपाटीपासून २०० मीटर उंचीच्या, मुख्यतः ओलसर व दलदलीच्या जागी सापडते किंवा हिमालयाच्या आग्नेय, ओलसर भागात सापडते. कर्नाटकात व भारताच्या इतर भागात याची लागवड करतात. ३ औषधी गुणधर्म असणाऱ्या या झाडाचे वाळवलेले मूलस्तंभ म्हणजे वेखंड होय आणि हे औषधात वापरतात. वेखंडात बाष्पनशील तेल असल्याने ते वायूनाशी म्हणजे पोटांचे फुगणे आणि तत्सम वाटणे यावर गुणकारी आहे. वेखंडामुळे पचनशक्ति वाढ होते. वेखंड हे पोटदुखीवर घरगुती उपाय म्हणून प्रसिध्द आहे. यात असलेल्या बाष्पनशील तैलद्रव्यामुळे हे कफ पडण्यास मदत करते. वेखंडामुळे घशातील ग्रंथी वाहतात तसेच ते दम्यावर गुणकारी आहे. यात असलेल्या टॉनिक या द्रव्यामुळे तेसंग्रहणी, रक्ताचा अतिसार यावर उपयोगी आहे. वेखंड मोठया प्रमाणात घेतल्यास ते वांतीकारक म्हणून काम करते आणि मोठ्या प्रमाणावर वांत्या होतात. पाने आणि मूलस्तंभ सुगंधी पदार्थात, पेयात आणि कीटकनाशके तयार करण्यात वापरतात. मूलस्तंभातील तेल मज्जासंस्थेस उत्तेजित करणारे आहे.
अल्कोहोलमध्ये काढलेले तेलविरहित अर्क गुंगी आणणारे तसेच वेदनाशमन करणारे आहे. हे गुणधर्म वेखंडाची मानसिक रोगामध्ये उपयुक्तता सिध्द करतात. वेखंडाच्या मुळांची भुकटी कृमीउत्सर्जक असते. मूलस्तंभाची जीवाणू विरोधी क्षमता सप्रयोग सिध्द झाली आहे. जवळ जवळ १.३ लाख रूपयाची २.८० क्विंटल्स मूलस्तंभ १९७५-७६ साली निर्यात करण्यात आले.
– कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
*शेतकऱ्यांच्या माहितीस्तव साप्ताहिक कृषकोन्नती वरून साभार…*
शेतीला एक फायदेशीर व भरवशाचा जोडधंदा: शेतमाल प्रक्रिया उद्योग
1 thought on “औषधी वनस्पती”