शेतीला एक फायदेशीर व भरवशाचा जोडधंदा: शेतमाल प्रक्रिया उद्योग

शेतीला एक फायदेशीर व भरवशाचा जोडधंदा: शेतमाल प्रक्रिया उद्योग

 युरोपिय राष्ट्रामध्ये एकच पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते. मात्र आपल्या देशात कृषि हवामान निहाय, राज्यनिहाय पीकविविधता असल्याने कृषि प्रक्रिया उद्योगासाठी कच्च्या मालाची उपलब्धता सहज होवू शकते. कृषिमाल प्रक्रिया उद्योगही काळाची गरज असली तरी कृषि पुरक धंदाही तितकाच महत्वाचा आहे. पशुधन विकास आणि दुग्धोत्पादन, शेळी, मेंढी आणि लोकर उत्पादन अशी विविध कृषि क्षेत्रे उपलब्ध असून एकात्मिक शेती म्हणजेच फार्मिंग सिस्टिम निर्माण करण्यास प्रचंड वाव आहे. आर्थिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना व्यावसायिक भांडवलाची अनुदान रुपाने अथवा दीर्घमुदतीच्या अत्यल्प व्याजदराची उपलब्धता निर्माण होणे गरजेचे आहे.

शेतकरी मोठ्या जिद्द आणि कष्टांनी अन्नधान्याचे उत्पादन घेतो. काढणी पश्चात तंत्रज्ञानाऐवजी प्रचलित हाताळणीमुळे तसेच विक्री करुन उत्पादित मालाच्या सुमारे २० टक्के नासाडी होत असते. म्हणूनच त्यास प्रक्रिया उद्योगाची जोड मिळाल्यास या नासाडीत नक्की घट येईल यात शंका नाही.

नासाडीची परिस्थितीची कल्पना शेजारील तक्तावरून येईल. तसेच शेतकऱ्यांसाठी एक नवी बाजारपेठ उपलब्ध होईल. कायद्याने मुभा मिळालेल्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या एकाधिकार पध्दतीला पर्याय निर्माण होईल. बाजार समितीच्या आवाराबाहेरील मार्केट फी (सेस) आकारणी रद्द करण्याची राज्य शासनाची योजना व आदेशही मान्य करीत नाहीत यास आपोआप आळा बसेल ग्राहकाला वाजवी दरात शेतमाल मिळावा आणि दुसरीकडे शेतकऱ्यालाही किफायतशीर मोबदला मिळावा या दृष्टीने कृषिमाल प्रक्रिया हे अतिशय विधायक आणि स्तुत्य पाऊल ठरणार आहे पर्यायाने महानगरामध्ये छोटी छोटी थेट खरेदीची केंद्रे उभी राहू शकतील. थेट मार्केटींग लायसन्स अंतर्गत अनेक गुंतवणूकदार खरेदी केंद्राच्या माध्यमातून अशा सुविधा उभारायला उत्सुक आहेत. अशा व्यवस्थेमुळे ग्राहक आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होणार आहे. आजकाल बाजार समितीमधील सावळा गोंधळ पाहिल्यावर तर ही बाब काळाची गरज ठरणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी त्यांची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करुन व्यावसायाभिमुख कार्यरत राहणे आवश्यक आहे.

https://krushiwarta.com/
https://krushiwarta.com/
https://krushiwarta.com/
https://krushiwarta.com/

 

 

 

 

 

 

शेतमाल ग्रामीण भागात प्रमुख उत्पादित बाब असून शेतकऱ्यांकडून ते उपलब्ध होवू शकते. शेतकऱ्यांना किफायतशीर भाव, अगदी बांधावरची विक्री आणि श्रमाची, वेळेची बचत होते. अशा विविध सुविधा मिळू शकतील. उपलब्ध वीज, पाणी आणि आवश्यक यंत्रसामुग्रीव्दारे आपण ग्रामीण भागात कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करु शकतो. माहिती तंत्रज्ञान इंटरनेट कम्युनिकेशन, संगणक सुविधा याही सर्वत्र उपलब्ध आहे. आवश्यक रस्त्याच्या सुविधा, मालाची वाहतूक आणि साठवणूक सुविधांमध्ये खूपच सुधारणा झाली आहे. कृषि उद्योगामार्फत आपण आपल्याबरोबर ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना देखील रोजगार उपलब्ध करु देवू शकतो. कृषि प्रक्रिया उद्योग मंत्रालय भारत सरकार यासाठी कृषि औद्योगिक केंद्रे काढत आहे.

https://krushiwarta.com/
https://krushiwarta.com/

कृषि उद्योगाची निवड करण्यापूर्वी स्थानिक अथवा जवळपासच्या मोठ्या प्रमाणावर पिकविणाऱ्या पिकांच्या उत्पादनाचा अंदाज महत्वाचा आहे. एकाच प्रक्रियेवर अवलंबून न राहता मूल्य वर्धनाची साखळी निर्माण झाल्यास ते फायदेशीर ठरते. उदाहरणार्थ सोयाबीन पासून तेल, दुध, पावडर, सोया पनीर इत्यादी साखळी पदार्थ जमेल तेवढे तयार व्हावेत. विदर्भ मराठवाड्यात सोयाबीन, तुर, मुग, मटकी, ज्वारी अशी विविध पीक उत्पादने प्रक्रिया करुन कडधान्ये डाळी, तुर गळीतधान्ये, सोयाबीन करडई तेल व पेंड इत्यादी) त्यांचे निश्चीतपणे मुल्यसंवर्धन करणे शक्य आहे. त्याच प्रमाणे फळापासुन पल्प, रस, जॅम, क्रॅश बनविणे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. फळेही नाशवंत असल्यामुळे परिपक्ततेनंतर त्यावर त्वरीत प्रक्रिया करावी लागते. डाळींब, पेरु, पपई, अशा फळामध्ये लहान आकाराच्या फळास किंमत अल्प असते पण प्रक्रिया केल्यास त्याची किंमत कितीतरी पटीने वाढते. भाव पडल्यास फळे टाकावू होतात. त्यावेळी प्रक्रिया कामास येईल.

 

*हवामानातील बदल, तसेच पावसाची अनियमितता आणि शेती बाजाराला योग्य भाव न मिळणे अशा अनेक प्रश्नांमुळे शेतकरी शेतीकडे पाठ फिरवून शहरकरणाकडे वळत आहेत. वाढते औद्योगिकरण, माहिती तंत्रज्ञानातील क्रांती आणि सेवा विभागाचा विकास या बाबी कृषी क्षेत्राचे स्थलांतर होण्यास कारणीभूत होत आहेत. शेतीला फायदेशीर आणि भरवशाचा जोडधंदा असणे गरजेचे झाले आहे. शेतमाल प्रक्रिया अथवा शेतीपुरक उद्योग हा उत्तम पर्याय होवू शकतो. देशाचे आजचे कृषिमाल उत्पादन समाधानकारक आहे. अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण आहोत. फळे उत्पादनात जगात चीन नंतरचे दो नंबरचे आपले स्थान आहे. बासमती तांदळाची ३.५ दशलक्ष टनाचे हजारो कोटीचे निर्यातीचे लक्ष साध्य केले आहे. पण तरीही देशातील शेतकरी सुखी आणि समाधानी नाहीत. कोरडवाहू शेतकरी अंतिम पर्याय स्वीकारीत आहेत. एकाच वेळी डोळ्यात हसु आणि आसू अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसऱ्या हरित क्रांतीचा विचार रुजत आहे. पण उत्पादन वाढूनही जर त्याचा आर्थिक लाभ शेतकऱ्यांना न मिळाल्यास शेतकऱ्यांचा उद्रेक होईल.*

भाजीपाल्याच्या निर्जलीकरणाचे विविध तंत्रज्ञान उपलब्ध आहे. कौशल्य आणि नाविन्यता हा कृषी उद्योगाचा आत्मा राहणार आहे. कोकणातील आंबा, काजू, कोकम, आणि मसाल्याची पिके ही प्रक्रियेस प्रतिसाद देणारी आहेत. ग्रामीण भागातील एकटा शेतकरी प्रक्रिया उद्योजक मग तो कितीही छोट्या प्रमाणात असो होण्यास अनेक अडचणी आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रितपणे गटाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादन कंपनी ची नोंदणी करावी. महाराष्ट्रास सहकार विषय नवीन नाही. बचत गटाच्या माध्यमातून राज्यातील महिलांनी स्वबळावर इतिहास घडविला आहे. छोट्या कंपनीत एकजिनसीपण सहकार्य आणि एकमत असते.

विशेषतः कृषि प्रक्रिया उद्योगासाठी वित्तपुरवठा मिळवण्यामागे खूपच अडचणी आहेत. विशेषतः राष्ट्रीयकृत बँकांच्या बाबतीत खूपच उदासीन आहे. उद्योग क्षेत्रातील कर्ज परतफेडीच्या भानगडी आणि एनपीए आमच्या कृषिउद्योगाच्या आड येत आहे. यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीने पूर्ण अभ्यास करुन अहवाल बँकेकडे सादर करावा. प्रकल्प अहवालात उद्देश गुंतवणुकीची माहिती भांडवल ग्राहक, गुंतवणुकीची वेळ, प्रकार अशी माहिती भौगोलिक माहितीसहीत द्यावी. अहवालात कंपनीच्या ओळखीबरोबर कार्यप्रकल्पाची व्याप्ती, पध्दत प्रकल्प उभारणी, मशिनरी याबरोबर एकूण अंदाजपत्रक जमा खर्च निव्वळ नफा व ब्रेक इव्हन पॉईंट इ. परिपूर्ण माहिती असावी. प्रकल्पाची आर्थिक ५स्थिती व ५ वर्षे गुंतवणुकीनंतर स्थैर्यता गुणांक द्यावा. बँकेला मूलभूत सोयी बरोबर तारणासाठी जमीन याचाह तपशील आवश्यक असतो. प्रकल्प तंत्रशुध्द परिपूर्ण असल्याची खात्री पटवून द्यावी लागते. तंत्रज्ञान व अनुभवसिध्द मनुष्यबळ ही बँकेच्या दृष्टीकोनातून महत्वाची बाब असते. प्रकल्प अहवाल हा आकडेवारीचा खेळ नसून यशापयश ठरविणारा महत्वाचा घटक आहे.

कच्च्या मालाची सखोल माहिती, आकडेवारी पुरवठ्याचे सातत्य असणे आवश्यक आहे. तसेच उद्योग उभारताना पुढील ते ७ वर्षांचे उत्पादन विक्री व्यवस्थापनाचे नियोजन असणे आवश्यक आहे. प्रक्रिया उद्योगाला कच्च्या मालाचा सातत्याने पुरवठा व्हावा यासाठी गावाच्या आसपासच्या शेतकऱ्यांशी करार शेती करून कच्चा माल चांगल्या दर्जाचा व वेळेवर उपलब्ध होवू शकेल. अन्न प्रक्रिया उद्योग थेट ग्राहकांच्या आरोग्याशी निगडीत असल्यामुळे त्यात यशस्वी होण्यासाठी अन्नसुरक्षा कायदा आणि मानके याचा अभ्यास असणे आवश्यक आहे. तज्ञ सल्लागारामार्फत वेळोवेळी होणारे क्रमप्राप्त बदल समजावून घेणे क्रमप्राप्त असून उद्योग उभारताना विविध संस्थाकडून सर्टिफिकेशन मिळविणे आवश्यक आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी सेंट्रल फूड टेकॉलॉजीकल रिसर्च इन्स्टिट्युट मार्फत प्रक्रिया उद्योगासाठीची यंत्रे आणि तंत्रज्ञान इंटरनेटवर उपलब्ध आहे.

डॉ. शंकरराव मगर

अध्यक्ष, कृषि विस्तार प्रतिष्ठान,

इंदापूर आणि मा. कुलगुरु

डॉ. बा.सा. को. कृ. वि. दापोली.

शेतकऱ्यांच्या माहितीस्तव साप्ताहिक कृषकोन्नती वरून साभार…

6 thoughts on “शेतीला एक फायदेशीर व भरवशाचा जोडधंदा: शेतमाल प्रक्रिया उद्योग”

Leave a Comment

close
Thanks !

Thanks for sharing this, you are awesome !